अनुष्कानं लिहिली कोहलीच्या कर्णधारपदाची अनटोल्ड स्टोरी

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli and Anushka Sharma)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli and Anushka Sharma)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) एक भलीमोठी भावनिक पोस्ट लिहित विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टन्सीच्या प्रवासाच्या आठवणीला उजाळा दिला आहे. कोहलीने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनुष्काने सोशल अकाऊंटवरच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli and Anushka Sharma)
Video मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक थांबवली, सीएमने फटकारले, म्हणाले...कोणी राजे आलेत का?

अनुष्काने विराट कोहलीसोबतचे दोन खास फोटो शेअर केले आहेत. दोन्ही फोटोमध्ये विराट कोहली भारतीय कसोटी संघाच्या जर्सीमध्ये दिसतोय. एका फोटोमध्ये अनुष्का विराटला किस करताना दिसते. तर दुसऱ्या फोटोत विराट एकटा दिसत आहे. विराटप्रमाणेच अनुष्कानेही तिच्या पोस्टमध्ये धोनीचा उल्लेख केला आहे. मात्र, याशिवाय अनुष्काने इतर कोणत्याही खेळाडूबद्दल लिहिलेले नाही.

काय लिहिलेलं अनुष्काने

मला 2014 मधला तो दिवस आठवतो जेव्हा तु मला सांगितले होतेस की, तुला कर्णधार बनवण्यात आले आहे. कारण एमएसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मला आठवतंय एमएस, तू आणि मी त्या दिवशी गप्पा मारल्या होत्या आणि तो सांगत होता की तुझी दाढी किती लवकर पांढरी होईल. तेव्हा सर्वत्र एकच हशा पिकला होता. त्या दिवसापासून, मी तुझी दाढी पांढरी झालेली पाहिली आहे.

मी वाढ पाहिली आहे. अफाट वाढ. तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या आत. आणि हो, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझी प्रगती आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने कोणती कामगिरी केली याचा मला खूप अभिमान आहे. पण तू स्वतःमध्ये जी वाढ केली आहेस. त्याचा मला अधिक अभिमान आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli and Anushka Sharma)
श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले...

विराट कोहली हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडच्या जमिनीवर टेस्ट सीरिजमध्ये आघाडी घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com