जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या कटासंदर्भातील कथित ध्वनिफितीवरून (Audio), आव्हाडांच्या समर्थकांनी ठाणे महानगर पालिकेचे (Thane Municipal Corporation) अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांना काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती.

याप्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक केले जाऊ शकत होती.

मात्र जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयासमोर (Court) धाव घेत, अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या आधारे आव्हाड यांना तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांचा अटकपूर्व जामीन (Anticipatory bail) मंजूर करण्यात आला आहे. आज सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता.

…अन् सुषमा अंधारेंचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ सापडला

काय आहे प्रकरण ?

महेश आहेर यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात (Naupada Police Station) तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत आपण आव्हाड यांच्या मतदारसंघात केलेल्या बेकायदेशीर बांधकाम (Illegal construction) तोडल्याप्रकरणी मनात राग धरून आव्हाड यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने बंदूक आणि चॉपरच्या सहाय्याने वार करण्याच्या हेतूने हल्ला केला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

इतिहासात भोपळा, कलेत मात्र १००…; मार्कशीट व्हायरल करत राष्ट्रवादीनं कोश्यारींना डिवचलं

या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांचे पीए अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व इतर ३ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *