Friday, April 26, 2024
Homeजळगावभोसरी जमीन घोटाळा : मंदाताई खडसे ईडी कार्यालयात दाखल

भोसरी जमीन घोटाळा : मंदाताई खडसे ईडी कार्यालयात दाखल

पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा (Bhosari MIDC land Scam) प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) ईडी (ED) कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने मंदाकिनी खडसे यांच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज मंदाकिनी खडसे या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse)यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यांना अधीही अटक केलं जाण्याची शक्यता होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या कालावधीत त्यांनी ईडीला तपासकार्यात सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले. त्यानुसार सौ.खडसे ईडी कार्यालतात दाखल झाल्या.

मुंबई सेशन कोर्टाने काढला होता वारंट

यापुर्वी मुंबई सेशन कोर्टाने मंदाताई खडसे यांचा अटकपुर्व जामीन (anticipatory bail)अर्ज फेटाळला होता. तसेच अजामीनपात्र वॉरंट (non-bailable warrant)जारी केले आहे. यामुळे मंदाताई खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दिलासा दिला आहे.

एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत. या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यापूर्वी अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. मंदाताई विरुद्ध अटक वॉरंट जारी झाला असतांना एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई सेशन कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑक्टोंबर रोजी ठेवली आहे.

भोसरी भूखंड प्रकरण आहे तरी काय?

2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.

या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली.

दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या