Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत २१ कोटीचे ड्रग्ज जप्त, महिलेस अटक

मुंबईत २१ कोटीचे ड्रग्ज जप्त, महिलेस अटक

आर्यन कान ड्रग्स प्रकरण ताजं असताना मुंबईतून मोठ्या प्रमाणात ड्रग्स ताब्यात घेतले आहेत. मुंबईतील सायनमधून 21 कोटींचं 7 किलो हिरोइन (heroin)जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित ड्रग्स तस्कर महिलेला अटक (Smuggler) केली असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत NCB ने मुंबईत अनेक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्कारांवर कारवाई केली आहे. संबंधित कारवाईत NCBने कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. यानंतर आता मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली आहे. मुंबईसह राजस्थानमध्ये अमली पदार्थाचं मोठं रॅकेट असल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान, क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर (Bail Application) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष एनडीपीएस कोर्टात (NDPS Court) आज सुनावणी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या