जळगावात दूध वाटप करुन भाजपचे आंदोलन
मुख्य बातम्या

जळगावात दूध वाटप करुन भाजपचे आंदोलन

आ.राजुमामा भोळे यांच्याहस्ते मोफत दुध वाटप

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

राज्यातील शेतकऱ्यांना दूधाचे भाव वाढवून मिळावेत, दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव द्यावा किंवा प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी आज जळगाव येथे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा दूध संघाच्या गेटवर सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महायुतीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती सुचेता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह राजेंद्र घुगे, विशाल त्रिपाठी, प्रवीण कोल्हे, भरत कोळी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी नगरातील एस.के.ऑईल मिल जवळ सर्व कार्यकर्ते एकत्र झाले. जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्याहस्ते गरीब मुले व महिलांना मोफत दुध वाटप करण्यात आले.

दुधाला भाव मिळालाच पाहिजे, आघाडी सरकार मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. एस.के.ऑईल मिल ते जिल्हा धोधो संघाच्या गेटपर्यंत घोषणादेत सरकारचा निषेध करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com