File Photo
File Photo
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये आजपासून दररोज होणार एक हजार रुग्णांची 'अँटी जेन' चाचणी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | Nashik | प्रतिनिधी

नाशिक शहरातील काही प्रतिबंधीत क्षेत्रात आज पासून अँटिजेंन तपासणी (Anti Gene Testing ) केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

नाशिक शहर व परिसरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने ऑंटीजेन तपासणी केली जाणार आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनदेखील आयुक्त गमे यांनी केले आहे.

नाशिक शहरात वाढता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्याच्यावर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शहरातील पूर्व, पश्चिम, पंचवटी,नाशिकरोड, नवीन नाशिक व सातपूर या सहा विभागीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रात प्राधान्याने अँटिजेंन टेस्ट केल्या जाणार आहेत.

दररोज साधारण ८०० ते १ हजार इतक्या नागरिकांची अँटिजेंन तपासणी केली जाणार असून यामध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने व्यवस्था पुरेसे बेड उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

या तपासणीच्या माध्यमातून रुग्ण मिळून आल्याने त्वरीत त्यावर उपचार सुरु करुन प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्यावर उपाययोजना सुरू असून संख्या वाढत असल्याने कुणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन मनपाच्या वतीने आयुक्त गमे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com