असंख्य बेकायदेशीर कामांवर उद्यापासून हातोडा

असंख्य बेकायदेशीर कामांवर उद्यापासून हातोडा

नाशिक | प्रतिनिधी |Nashik

शहरात विविध ठिकाणी प्रचंड वाढलेल्या अतिक्रमणाला (Encroachment) आळा घालण्यासाठी नाशिक महापालिकेने (Nashik NMC) विशेष मोहीम हाती घेतली आहे. आज पंचवटी (Panchavati) भागात काही प्रमाणात अतिक्रमण हटविण्यात आले....

असंख्य बेकायदेशीर कामांवर उद्यापासून हातोडा
देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' आरोपानंतर हसीना पारकर पुन्हा चर्चेत, जाणून घ्या तिच्याविषयी

उद्यापासून शहरात जोरदार अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सुमारे शंभर अधिकारी व सेवक यांच्यासह पोलीस (Police) फौजफाट्यासह सातपूर परिसरातील त्रंबकरोड, बारदान फाटा आदी भागातील लहान-मोठे अतिक्रमण तसेच पक्क्या बांधकामांवर हातोडा पडणार आहे. ही मोहीम काही दिवस सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त करुणा डहाळे (Karuna Dahale) यांनी दिली.

नाशिक शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनेक वेळा नोटीस देऊन तसेच सूचना करूनही अतिक्रमण काढले जात नाही. एकीकडे महापालिका प्रशासनाने ठीकठिकाणी हॉकर्स झोन तयार केले असले तरी त्याचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही, तर दुसरीकडे मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत दिवाळीपूर्वी (Diwali) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी आवाज उठवल्याने दिवाळीनंतर शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी दिले होते. प्रभारी आयुक्तांनी त्वरित सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या होत्या.

यानुसार आजपासून शहरात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करून पंचवटी भागातील काही अतिक्रमण काढण्यात आले. मात्र उद्यापासून पोलिसांच्या फौजफाट्यासह तीन विभागीय अधिकारी यांच्या पथकांच्याद्वारे सुमारे शंभर महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी व सेवक या मोहीमेत सहभागी होणार आहे. तसेच चार वाहने व इतर साहित्यसोबत असणार आहे.

नाशिक शहरात महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी हॉकर्स झोन तयार करून देण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी त्याचा वापर होताना दिसत नाही. यामुळेदेखील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रशासनाने आता यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून उद्या सातपूर परिसरात त्रंबकरोड, बारदान फाटा आदी भागात मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com