Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांचा शासकीय दौरा अचानक रद्द; 'हे' आहे कारण

मुख्यमंत्र्यांचा शासकीय दौरा अचानक रद्द; ‘हे’ आहे कारण

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शासकीय विमानात (Government Plane) पुन्हा एकदा बिघाड झाल्याने गोंधळ उडाला आहे…

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड हे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील कार्यक्रमाला मुंबईहून विमानाने जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब (Bad weather) असल्याने विमानाला परत माघारी यावे लागले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, जळगावमध्ये गेल्या पाच दिवसांपासून गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाचा धर्म कुंभ सुरु होता. या कुंभाचा समारोप आज होणार आहे. त्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी जात असतांना मुख्यमंत्र्यांच्या विमानात बिघाड झाला. तसेच या समारोपाच्या कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्यासह योगगुरू बाबा रामदेव हे सुद्धा उपस्थित राहणार होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या