Sulli Deals अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचा लिलाव, गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

Sulli Deals अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचा लिलाव, गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

सुल्ली डिल्स (Sulli Deals) या अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांचा लिलाव करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या अ‍ॅपवर80 हून अधिक महिलांची 'बोली' लावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी असाच सुल्ली डिल्स (Sulli Deals) नावाचा प्रकार घडला होता. त्यामुळे हा दुसरा सुल्ली डिल्स तर नाही ना? असं बोललं जात आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी (Shivsena MP Priyanka Chaturvedi) आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील-यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिली आहे. महिला आयोगानेही याची गंभीर दखल घेतली आहे.

Sulli Deals अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचा लिलाव, गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

काय आहे प्रकार?

मुस्लिम महिलांची खासगी माहिती, फोटो टाकून इंटरटेनटवर त्यांच्या ट्रोलिंगचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. पुन्हा एकदा अशाप्रकारची तक्रार समोर आली. त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी केंद्र सरकारच्या आयटी, गृह मंत्रालय आणि मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाई करण्याची विनंती केली.

आधी #SulliDeals नावाने ट्रोल करणारे आता #BulliDeals नावाने महिलांन त्रास देत आहेत. मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि ट्विटरनं त्यासाठी मदत करावी असं प्रियंका चतुर्वेदींनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी 30 जुलै आणि 6 सप्टेंबरला माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिल्याची माहिती दिली. ही पत्रंही त्यांनी ट्वीटद्वारे शेअर केली आहेत.

Sulli Deals अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचा लिलाव, गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

काय आहे सुल्‍ली डील्‍स?

'सुल्‍ली' एक टर्म आहे, ज्याचा वापर काही लोक मुस्लीम महिलांसाठी करतात. सुल्ली डिल्स (Sulli Deals) गिटहबवरील एक अ‍ॅप आहे. ते ओपन केल्यानंतर यूझर्सना मेसेज दिसेल, ‘Find your Sulli Deal of the Day’. पुढे गेल्यानंतर आपल्याला रँडमली कुण्या मुस्लीम महिलेचा फोटो दिसेल. जी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरून घेतलेली असेल. खरे तर, याच्याशी संबंधित लोकांनी ट्विटरवरवर 'डील ऑफ द डे' म्हणून फोटो शेअर करायला सुरुवात केल्यानंतर, या अ‍ॅपची चर्चा सुरू झाली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com