आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

मुंबई | Mumbai

वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क असे एकापाठोपाठ मेगा प्रोजेक्ट राज्याबाहेर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या वाटेवरचा 'ऊर्जा उपकरण निर्मिती'चा आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे.

केंद्र सरकारकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात राज्याला अपयश आलं आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ४०० कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे. हा प्रकल्प मिळण्यासाठी आठ राज्यांमध्ये स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत मध्य प्रदेश एमआयडीसीने बाजी मारली आहे.

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या आठ राज्यांमध्ये स्पर्धेत होते. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र एमआयडीसी ने केंद्र सरकारला पत्र पाठवलं होतं.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे मूल्यांकन प्रकल्प व्यवस्थापन एजन्सी (PMA) द्वारे विभागाने तयार केलेल्या कार्यपद्धतीवर आधारित होते. मात्र मूल्यमापनामध्ये मध्यप्रदेश एमआयडीसीने सर्वाधिक गुण मिळवल्याने पीएमएच्या निदर्शनास आलं. त्यानुसार हा हा प्रकल्प मध्यप्रदेशला देण्याची शिफारस करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com