नाशकात चाललंय तरी काय? पुन्हा एकाचा निर्घुण खून

नाशकात चाललंय तरी काय? पुन्हा एकाचा निर्घुण खून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काल अंबड परिसरातील (Ambad Area) एक्सलो पॉईंट येथे वारंवार किरकोळ कारणावरून मुलगी घर सोडून जात असल्याचा राग अनावर झाल्याने पित्याने मुलीचा गळा आवळून खून (Murder) केल्याची घटना घडली...

यापाठोपाठ रात्रीच्या सुमारास सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोशिरे मळा परिसरात एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घुण खून झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोशिरे मळा परिसरात दोन जणांची जुन्या भांडणाची कुरापत काढून हाणामारी झाली.

नाशकात चाललंय तरी काय? पुन्हा एकाचा निर्घुण खून
Video : वलखेड फाट्यावर 'द बर्निंग कार'चा थरार

भांडण इतके टोकाला गेले की, संतापाच्या भरात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. संतोष जैस्वाल (रा. गोरक्षनाथ रोड, काश्मीरे मळा) असे मयताचे नाव आहे.

नाशकात चाललंय तरी काय? पुन्हा एकाचा निर्घुण खून
Nashik Crime : पित्याने केली मुलीची हत्या

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेतील दोन जण फरार आहेत. रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे सुरु होते. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com