Monday, April 29, 2024
HomeUncategorizedबालकांसाठी आणखी एका लसीला परवानगी; महाराष्ट्रात होणार उत्पादन

बालकांसाठी आणखी एका लसीला परवानगी; महाराष्ट्रात होणार उत्पादन

पुणे | प्रतिनिधी Pune

गेली दोन वर्षे जिथून करोनाने हाहाकार माजवला त्याच चीनमध्ये आता काही शहरांत लॉकडाऊन लावलेले आहे. यापार्श्वभूमीवर भारतात लसीकरण पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरु आहे….

- Advertisement -

१२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत एकाच लसीला परवानगी देण्यात आली होती. मात्र, नुकतीच डीसीजीआयने (DCGI) आणखी एका लसीच्या वापरला परवानगी दिल्यामुळे या वयोगटातील लसीकरण वेग घेणार आहे….

प्राप्त माहितीनुसार 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एका कोविड व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने नोव्हावॅक्स या (Novavax Covid-19 Vaccine) लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

ही लस भारतात 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याआधी या मुलांना हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. कंपनीची कोर्बेवॅक्स लस दिली जात होती. या लसीचा दुसरा डोस २८ दिवसांच्या अंतराने घ्यावा लागणार आहे.

Novavax नावाच्या लसीची निर्मिती पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने केली आहे. ही पहिली प्रथिने-आधारित लस आहे, जी भारतातील 12 ते 18 या वयोगटात मुलांसाठी वापरण्यासाठी अधिकृत करण्यात आली आहे.

नोव्हावॅक्स ही प्रोटीन सबयुनिट लस असून ती इतर लसींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. प्रोटीन सब्यूनिट हा लसीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यापासून ते संरक्षण करतात.

करोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी, त्यात स्पाइक प्रोटीन असतात, जे विषाणूच्या पृष्ठभागावर कव्हर करतात, ज्याला रोगप्रतिकारक शक्ती सहजपणे ओळखू येते असे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या