Wednesday, April 24, 2024
Homeजळगावखडसेंना आणखी एक धक्का : दूध संघ गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती गठीत

खडसेंना आणखी एक धक्का : दूध संघ गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती गठीत

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघात (Jalgaon District Milk Producers Association) पाच वर्षाच्या कार्यकाळात मोठा गैरव्यवहार (big malfeasance) झाल्याची तक्रार नागराज जनार्दन पाटील (Nagraj Janardan Patil) यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय विभागाचे उपसचिव (Deputy Secretary, Dairy Department) यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत (Inquiry committee constituted) केली आहे. तसेच समितीच्या चौकशीच्या अनुषंगाने दि. 20 ऑगस्टपर्यंत अहवाल पाठविण्याचे आदेश दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त यांना देण्यात आले आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीला दुध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या संघाच्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 438 ठराव प्राप्त झाले आहेत. दरम्यान दुध संघाची निवडणूक प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. असे असतांना अचानकपणे गुरूवारी जिल्हा दुध संघातील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश निघाले आणि एकच खळबळ उडाली.

पाच सदस्य करणार दुध संघाची चौकशी

जिल्हा दुध उत्पादक संघात मोठा गैरव्यवहार असल्याची तक्रार नागराज जनार्दन पाटील यांनी केली आहे. त्यानुसार भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दि. 8 जुलै रोजी संघाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय विभागाचे उपसचिव यांनी पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. तसेच समितीच्या चौकशीच्या अनुषंगाने दि. 20 ऑगस्टपर्यंत अहवाल पाठविण्याचे आदेश दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त यांना देण्यात आले आहे.

अशी आहे चौकशी समिती

या समितीत अध्यक्ष म्हणून स.शा.पुरव (विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था (मत्स्य)), कै.मो.दळवी- (लेखापरीक्षक श्रेणी-1), आ.ई. नलावडे (लेखापरीक्षक श्रेणी-1), यो. र. खानोलकर (लेखापरीक्षक), जु.रु. तडवी (लेखापरीक्षक श्रेणी-2) यांचा समावेश आहे.

एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का

जिल्हा दुध संघावर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा प्रभाव राहिला आहे. गत साडेसहा वर्षापासून त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे ह्या चेअरमन आहेत, तर सर्वपक्षीय आमदार यात संचालक आहेत. जिल्हा दुध संघाची चौकशी होणे हा एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंना पुन्हा खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

भ्रष्टाचारी माणसांना चांगल्या संस्था खुपतात जिल्हा दुध संघाची पुर्वीची परिस्थीती लक्षात घेता गत सात वर्षात अत्यंत चांगला कारभार राहिला आहे. याबाबत दुध डेअरीचे प्रतिनीधी देखिल सांगतिल. तसेच या संघाच्या संचालक मंडळात सर्वपक्षीय आमदार आहेत. संघात जर गैरकारभार झाला असेल तर मग या संचालकांना भ्रष्टाचारी म्हणावे लागेल. दुध संघात एक रूपयाचाही गैरव्यवहार नाही, आम्ही चौकशीला तयार आहोत. दोन महिन्यासाठी प्रशासक मंडळ बसविणे हे योग्य नाही. कारण यात सरकारचे भागभांडवल नसल्याने प्रशासक मंडळ हे नियमबाह्य आहे. मात्र भ्रष्टाचारी माणसांना चांगल्या संस्था खुपतात अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी समाचार घेतला आहे.

आमदार एकनाथराव खडसे

- Advertisment -

ताज्या बातम्या