Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभगूर नगरपरिषदेसाठी आरक्षण सोडत जाहीर; 'अशी' आहे प्रभाग रचना

भगूर नगरपरिषदेसाठी आरक्षण सोडत जाहीर; ‘अशी’ आहे प्रभाग रचना

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

स्वातंत्र्यवीर वि. दा. तथा तात्याराव सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची (Election) आरक्षण सोडत नागरिक व विविध पक्षाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली…

- Advertisement -

त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग २ अ व प्रभाग१० अ तर अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी प्रभाग १ अ व अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी प्रभाग ८ अ राखीव झाला आहे. यंदा मागील निवडणुकीपेक्षा 3 नगरसेवक वाढून ही संख्या 20 झाली आहे. भगूर नगर परिषद कार्यालयात उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी (Nilesh Shringi) यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, मुख्य लिपिक रमेश राठोड उपस्थित होते. श्रींगी व गायकवाड यांनी निवडणूक विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रथम प्रभाग १/ २/ ९/ १०/ यामधून चार महिला आरक्षण चिठ्ठ्या एका बर्णीत टाकून लहान मुलगा कार्तिक खोकले याच्या हस्ते अगोदर अनु. जाती महिलासाठी चिठ्ठ्या काढल्या.

त्यात प्रभाग १० व २ निघाल्या तर यातील प्रभाग १ व ९ अ. अनु. जाती सर्वसाधारण राहिले, इतर सर्वसाधारण महिला आरक्षण आयोगाच्या नियमानुसार करण्यात आले.

अशी आहे प्रभाग रचना

प्रभाग १ अ – अनुसूचित जाती.सर्वसाधारण ब-खुला महिला,

प्रभाग २ अ – अनुसूचित जाती महिला ब- खुला सर्वसाधारण,

प्रभाग ३ अ – खुला महिला तर ब- खुला.सर्वसाधारण,

प्रभाग ४ अ – खुला महिला तर ब- खुला सर्वसाधारण

प्रभाग ५ अ – खुला महिला तर ब- खुला सर्वसाधारण

प्रभाग ६ अ – खुला महिला तर ब -खुला सर्वसाधारण

प्रभाग ७ अ – खुला महिला तर ब- खुला सर्वसाधारण

प्रभाग ८ अ – अनुसूचित जमाती सर्वसाधारण ब खुला महिला

प्रभाग ९ अ – अनुसूचित जाती सर्वसाधारण ब खुला महिला

प्रभाग.१० अनुसूचित जाती -महिला ब- खुला सर्वसाधारण सदर आरक्षण सोडत 2011 च्या जनगणनेनुसार व शासनाने दिलेल्या पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार काढण्यात आली.

त्यामुळे वीस नगरसेवकांमध्ये सात सर्वसाधारण पुरुष, आठ सर्वसाधारण महिला, दोन अनुसूचित जाती सर्वसाधारण, दोन अनुसूचित जाती महिला व एक अनुसूचित जमाती सर्वसाधारण असे वीस नगरसेवक असतील.

या आरक्षण सोडत बैठकीस दिपक बलकवडे, विशाल बलकवडे. काकासाहेब देशमुख, प्रसाद आडके, शंकरराव करंजकर, कैलास भोर.उत्तम आहेर ,शाम ढगे, संग्राम करंजकर, विक्रम सोनवणे, आर. डी. साळवे, निलेश हासे, बाळू साळवे, प्रमोद घुमरे, विलास कासार, सुदेश वालझाडे, अजय वाहणे, प्रकाश करंजकर, अभियंता रमेश कांगणे, शशांक तिवडे, रवींद्र संसारे, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या