Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्यानगरपंचायत निवडणूक : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर

नगरपंचायत निवडणूक : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील २२१ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या ( Nagar Panchayat Elections ) सार्वत्रिक निवडणुकांसाठी ( Elections ) २१ जून २०२२ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २७ जून २०२२ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) दिली.

- Advertisement -

मतदार यादीचा कार्यक्रम (draft voter list) जाहीर करण्यात आलेल्या २२१ नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये २०८ नगरपरिषदा आणि १३ नगरपंचायतींचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर २१ जून २०२२ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २१ ते २७ जून २०२२ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील.

त्यानंतर १ जुलै २०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ५ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात.

या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या