महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या संघांची घोषणा

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या संघांची घोषणा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दि. २७ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेबर दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) येथे उपकिनष्ट गटाच्या (१३ वर्षे) (sab Jr.) महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे (Maharashtra State Basketball Championship Tournament) आयोजन करण्यात आले आहे...

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या उपकिनष्ट गटाच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची अंतिम निवड झाल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली.

या राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्यांचे संघ निवड करण्यासाठी नुकतेच नाशिकरोड येथील यू. एस. जिमखाना क्रीडांगणवर नाशिक अमॅच्युअर  बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने उपकिनष्ट गटाच्या मुले आणि मुलींच्या नाशिक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे संभाव्य १६ मुले आणि  १६ मुलींची प्राथमिक निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या खेळाडूचे दिनांक २० ते २५ ऑक्टोबर दरम्यान सराव शिबिर घेण्यात आले. या सराव शिबिरातील कामगिरीच्या आधारे अंतिम १२ मुले आणि १२ मुलींची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये अंतिम निवड करण्यात आली आहे.

हे संघ कोल्हापूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. नाशिक जिल्ह्याच्या खेळाडूंना यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष यांच्या हस्ते किट (टी शिर्ट्स आणि शॉर्ट्स) वाटप करण्यात आले.

यावेळी दीपक पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि चांगला खेळ करून नाशिक जिल्ह्याचे नांव उंचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. नाशिकच्या खेळाडूंचा चांगला सराव झाला असून नाशिकचे दोन्हीही संघ राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी करून पदक प्राप्त करतील असे यावेळी प्रशिक्षक राजेश क्षत्रिय यांनी सांगितले.    

नाशिक जिल्हा संघ -         

 मुले – विलय विसपुते, राम राठी, प्रेरक जय कोठारी, अदित्य सिंह, साई लोखंडे, नैतिक सोनार, आर्यन ठाकूर, अब्बास यूसुफ रंगवला, अर्णव ढाके, अरूष क्षत्रिय, तन्मय हिरोळे, चिंतन पवार. 

प्रशिक्षक - आनंद द्रविड.

मुली – सोहा शिंदे, आर्या पाटील, आर्या व्यवहारे, आर्या सुडके, अक्षता शिंदे, रुई देशमुख, अवंनी सांगळे, श्रावणी पाटील, गार्गी लवाटे, सिद्धी पाटील, काव्या वाडकर, अस्मिता पाळदे.

प्रशिक्षक – गायत्री ढाकणे. 

मुख्य व्यवस्थापक – राजेश क्षत्रिय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com