जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा; ‘या’ दिवशी होईल पंढरपूरकडे प्रस्थान

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील संस्कृतीचा (Culture) अविभाज्य भाग झालेल्या आषाढी (Ashadhi) पालखीविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाबरोबरच सर्वच लहान-थोरांना ज्या पर्वनीची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे.

यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची (Saint Tukaram Maharaj) पालखी देहू येथून 10 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होईल. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी आज पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या पालखी सोहळ्याचे यंदा 338 वे वर्ष आहे.

अवकाळी पावसाचे थैमान! घरांचं नुकसान, विज गायब, हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त

यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरसाठी निघणार आहे. तर, 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. तर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेणार आहे. अन प्रत्यक्षात याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी ( Warkari) संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

हा पालखी सोहळा महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाबरोबरच सर्वांसाठीच एक आस्थेचा आणि संस्कृतीचा भाग झालेला आहे त्यामुळे या सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता असते, आजच्या घोषणेमुळे वारकरी संप्रदायामध्ये उत्साह संचारला आहे.

अन् चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *