द दारूचा नव्हे तर द दुधाचा!

द दारूचा नव्हे तर द दुधाचा!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सरत्या वर्षांला निरोप देतांना व नववर्षाचे स्वागत ( Welcome to New Year )करतांना मद्याच्या (liquor )आहारी जाऊ नये,असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्हा शाखेच्या(Maharashtra Superstition Eradication Committee Nashik District ) वतीने करण्यात आले.

या निमित्ताने हुतात्मा स्मारक समोर 'द दारूचा नव्हे तर द दुधाचा' प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. नाशिककरांना मद्याचे दुष्परिणाम पटवून देत मोफत मसाला दुधाचे वाटप (Distribution of free masala milk )केले.यावेळी 'चला व्यसनाला बदनाम करू या ', ' नो विस्की नो बिअर हॅपी न्यू ईअर हॅपी न्यू ईअर' अशा घोषणा देण्यात आल्या.

नववर्षाचे स्वागत फटाके फोडून व प्रदुषणाने करू नका .नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा ,असे आवाहनही करण्यात आले.या अनोख्या प्रबोधन कार्यक्रमाचे लोकांना कौतुक वाटले.

या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डाॅ.टी.आर.गोराणे , कृष्णा चांदगुडे,राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री,ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे,विजय खंडेराव, दिपक वर्दे, नितीन बागुल आदी कार्यकर्त उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com