अंकुश शिंदे यांनी स्वीकारला नाशिक पोलीस आयुक्तपदाचा पदभार

अंकुश शिंदे यांनी स्वीकारला नाशिक पोलीस आयुक्तपदाचा पदभार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य सरकारने नुकतेच आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर (B. G. Shekhar) यांची बदली झाली.

तर अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. आज त्यांनी नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.

अंकुश शिंदे हे याआधी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त होते. एप्रिल महिन्यात आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या जागी अंकुश शिंदे यांची वर्णी लागली होती. अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत अंकुश शिंदे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत अनेकांचे धाबे दणाणून सोडले होते.

२०१६-१७ मध्ये अंकुश शिंदे हे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते. येथूनच त्यांची पोलिस उप महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली होती. शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com