Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याटंचाई निवारणासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज

टंचाई निवारणासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अल निनोमुळे यंदा पावसाळा लांबण्याच्या शक्यतेमुळे संभाव्य चारा टंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी पडलेला चांगला पाऊस, त्यातच खरीप व रब्बी या दोन्ही हंंगामात चांगली आलेली पिके यामुळे जनावरांना सप्टेंबर अखेरपर्यंत चारा पुरेल अशी स्थिती आहे. मात्र पावसाळा लांबल्यास दिवाळी नंतर मात्र चारा टंचाईची भिती कायम आहे.

- Advertisement -

पालकमंत्री दादा भुसे यांनी गेल्या आठवड्यात संभाव्य टंचाईच्या पार्श्वभुमीवर बैठक घेतली होती. तेव्हा त्यांंनी जनावरांच्या चारा पाण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर विविध सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. संकटाच्या काळात जनावरांचे हाल टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागानेही आढावा घेतला आहे.अल निनोचे संकट उभे ठाकल्यास जनावरांचा चारा व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाकडून सूक्ष्म नियोजन केले जात आहे.

सध्या जिल्ह्यात 11 लाख 26 हजार 284 पशुधन आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांची संख्या 8 लाख 92 हजार 604 आहे. लहान जनावरे 2 लाख 23 हजार 680 आहेत. या सर्व जनावरांना दरमहा 1 लाख 80 हजार 800 मेट्रिक टन चारा लागतो. जिल्ह्यात 21 लाख 41 हजार 405 मेट्रिक टन चार्‍याचे उत्पादन झालेले आहे. त्यापैकी मार्च अखेरीस 9 लाख 40 हजार मेट्रिक टन चारा जनावरांंसाठी वापरला. सद्यस्थितीत 12 लाख 37 हजार 405 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. जनावरांना महिन्याकाठी लागणार चारा व सध्याची उपलब्धता विचारात घेता सप्टेंबर अखेरपर्यंत तो पुरेल, असा अंदाज आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला. पिकेही चांगली आली. त्यामुळे कडबा बर्‍यापैकी उपलब्ध आहे. तुर्त तरी चारा असल्याचे दिसत आहे. मात्र पाऊस लांबल्यास दिवाळी नंंतर टंचाई जाणवू शकते.

डॉ. बी.व्ही. गर्जे, जिल्हा पशुसंंवर्धन अधिकारी, नाशिक

तालुकानिहाय चारा (मे.टनमध्ये)

मालेगाव 1,04,817

बागलाण 71,996

कळवण 50,484

नांदगाव 54,441

सुरगाणा 49,239

नाशिक 49,588

दिंडोरी 55,609

इगतपुरी 41,885

पेठ 28,700

निफाड 64,782

सिन्नर 94,853

येवला 71,948

चांदवड 52,372

त्र्यंबकेश्वर 49,155

देवळा 35,936

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या