ST strike उद्यापर्यंत वाट पाहू, अन्यथा कारवाई कठोर असेल- परब यांचा इशारा

ST strike उद्यापर्यंत वाट पाहू, अन्यथा कारवाई कठोर असेल- परब यांचा इशारा
ST Bus

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा (MSRTC Employees Strike) तिढा सुटावा यासाठी पगारवाढीची (Salary Hike) घोषणा केली. पण या पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामगार संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. आता सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारी आहे. जे कामगार उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत त्यांना कडक कारवाईला (Strict Action) सामोरं जावं लागेल, असा इशारा अनिल परब (Anil Parab)यांनी दिला आहे.

ST Bus
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. तुमच्या ज्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. आता मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहून त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की पुढं कसं जायचं ते. संप मागे घेवून कामावर रूजू व्हावे. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आता अनिल परब यांनी दिला आहे.

तुटेपर्यंत ताणू नये

एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचे ऐकावे. तुटेपर्यंत ताणू नये, नंतर जोडता नाही येणार. जर काही राहिले असेल तर समितीसमोर मांडा. संप करून जनतेला वेठीला धरू नका. माझा संबंध कामगारांशी आहे, त्यांची लिडरशीप कुणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com