Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादसरा मेळाव्यासाठी पुढचा पर्याय कोणता? अनिल परब म्हणाले…

दसरा मेळाव्यासाठी पुढचा पर्याय कोणता? अनिल परब म्हणाले…

मुंबई | Mumbai

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) प्रयत्न केले जात असून मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) दोन्ही गटांना मेळावा घेण्याबाबतची परवानगी नाकारली आहे. यानंतर आता दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असेल? याबाबत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (MLA Anil Parab) यांनी स्पष्टीकरण दिले आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, न्यायालयाच्या (Court) निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून निकाल आल्यानंतर शिवसेना पुढील रणनीती ठरवेल. तसेच आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे शिंदे गटाकडून म्हटले जात आहे. मात्र हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. तर खरी शिवसेना (Shivsena) कुणाची हे न्यायालय आणि निवडणूक आयोग (Election Commission) ठरवणार असून खरी शिवसेना काय आहे, हे महाराष्ट्राने काल (दि.२१) रोजी मुंबईत पाहिले असे परब म्हणाले.

तसेच महानगरपालिकेने दोन्ही गटाला दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) परवानगी दिलेली नसून कदाचित पोलिसांनी (police) महापालिकेला याबाबत अहवाल दिला असेल. या अहवालाच्या आधारावरच महापालिकेने तसे पत्र दिले असेल. या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागितली असून उद्या या सर्वाचीच न्यायालयात चर्चा होईल. उद्या न्यायालय निकाल काय देणार हे पाहिले जाईल. त्यानंर रस्त्यावरची लढाई लढायची की नाही ते ठरवले जाईल, असेही परब यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या