Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedएसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मासंदर्भात अनिल परब म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मासंदर्भात अनिल परब म्हणाले…

मुंबई:

एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees)नवीन वेतनवाढ ( New pay hike)लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर मेस्मा (mesma)लावला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab)यांनी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, येत्या 20 डिसेंबर रोजी कोर्टात प्रकरण आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सरकारला आपलं प्राथमिक म्हणणं मांडायचं आहे, असं सांगतानाच एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावायचा की नाही यावर चर्चा सुरू आहे, असं त्यामुळे येत्या 20 तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावला जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

अनिल परब यांनी आज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याबाबत चर्चा सुरू आहे. सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं परब यांनी सांगितलं.

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

- Advertisment -

ताज्या बातम्या