माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अनिल देशमुख

मुंबई | Mumbai

मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ईडी कोठडीची मागणी फेटाळली असून त्यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे...

100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरु आहे. देशमुख यांनी गृहमंत्री असताना १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबर पर्यंत इडीची कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने कोठडी सुनावल्याने आता इडीच्या कोठडीतून देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येईल. त्यानंतर देशमुख यांच्याकडून जामिनासाठी अर्जदेखील दाखल केला जाऊ शकतो.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी, सीबीआय, आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यामुळेच देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुखांना ईडीने समन्स बजावले होते.

तब्बल पाच समन्स बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली होती. न्यायालयाने ईडीच्या कारवाईपासून कुठलाही दिलासा नाही, असं म्हटल्यानंतर शेवटी अनिल देशमुख सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. मंगळवारी त्यांना अटक करण्यात आले. आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com