अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला

अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई | Mumbai

100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ईडी कोठडीत (Ed Custody) आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे...

आता अनिल देशमुख यांना दि. 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. दि. १ नोव्हेंबरला देशमुख ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांना १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करून त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. आता देशमुख यांच्या ईडी कोठडीत (Ed Custody) आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. हृषिकेश यांनी शुक्रवारी ईडीपुढे चौकशीस हजर राहणे टाळले.

अनिल देशमुख यांना संशयित म्हणण्यात आले. त्यांची १२ तास चौकशी केल्यानंतर आरोपी म्हणून अटक करण्यात आले. तसेच आपल्याबाबत होईल, अशी भीती हृषिकेश यांनी केलेल्या जामीन अर्जात व्यक्त करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.