चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेंचा मोठा गौप्यस्फोट

चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेंचा मोठा गौप्यस्फोट
सचिन वाझेSachin Waze

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) न्या. चांदीवाल आयोगासमोर हजर झाला. त्यावेळी सचिन वाझे (Sachin Vaze) याने चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सचिन वाझे
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

सचिन वाझेंनी जबाब नोंदवला

अनिल देशमुखांनी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केलीच नव्हती असा जबाब आज सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर नोंदवला आहे. अनिल देशमुख यांचे वकिल गिरीश कुलकर्णी यांनी वाझेंची उलट तपासणी केली असता, त्यावेळी वाझेंनी देशमुखांकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करण्यात आलेली नाही, असा जबाब सचिन वाझेंनी नोंदवला आहे.

अनिल देशमुख यांच्याकडून तुम्हाला कधी कोणी बार आणि हॉटेल मालकांकडून पैसे जमा करा असे सांगण्यात आले होते का? यावर सचिन वाझे यांनी मला आठवत नाही, असे उत्तर दिले. परंतु तुम्ही बार किंवा हॉटेल मालकांकडून पैसे गोळा केलेत का? यावर त्यांनी नाही उत्तर दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com