माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक
अनिल देशमुख

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

१०० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (NCP leader Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले. बारा तासाहून अधिक काळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी (ED Office Mumbai) कार्यालयात चौकशी सुरू होती....

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. दुपारी पावणे बारा वाजेपासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर ईडीने देशमुखांना अटक केली आहे.

अटकेपूर्वी अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचेही समजते. या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सर्व आरोपींचे जबाबही देशमुख यांच्यासमोर ठेवण्यात आले. मात्र देशमुख यांनी कोणत्याही प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देता आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com