उसने पैसे परत मागितल्याने, तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला

उसने पैसे परत मागितल्याने, तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

राग अनावर झाल्यावर व्यक्ती काय पाऊल उचलेल याचा काही अंदाज नाही, रागाच्या भरातच काही जण टोकाची भूमिका घेतात आणि त्यातून अप्रिय घटना घडल्याचे अनेक उदाहरणं बघायला मिळतात. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) समोर आली आहे.

उसने दिलेले 100 रुपये परत मागितल्याच्या कारणावरून एका 30 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत कुऱ्हाडीने डोके फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जोगेश्वरी (Jogeshwari) परिसरातील ही घटना असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

उसने पैसे परत मागितल्याने, तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला
वेट अ‍ॅण्ड वॉच! अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच; राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जोगेश्वरी परिसरातील सुंदर चौतमल याने शेजारी राहत असलेल्या काळ्या शकील शेख या तरुणास आठ दिवसांपूर्वी 100 रुपये हात उसनवारीने दिले होते. हे उसने पैसे परत मागितल्याने शकील आणि सुंदरमध्ये वाद झाला.

उसने पैसे परत मागितल्याने, तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला
Accident : विचित्र अपघात, अनेक वाहने एकमेकांवर आदळली; पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

यावेळी शकील शेखने सुंदर यास जातिवाचक शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अमन शेख याने कुऱ्हाडीच्या दांड्याने सुंदर चौतमल याच्या डोक्यावर घाव घालत त्याचे डोके फोडले त्यामुळे सुंदरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या प्रकरणी सुंदर चौतमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात (Police Station) ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत ( Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com