अंगणवाडी भरती प्रक्रिया पारदर्शी होणार

महिला व बालकल्याण सभापती आर्कि.अश्विनी आहेर
अंगणवाडी भरती प्रक्रिया पारदर्शी होणार
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेतर्फे जिल्हयात 228 अंगणवाडी सेविका 839 अंगणवाडी मदतनीस व 85 मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे रिक्त आहेत. डिसेंबर 2019 अखेर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे.भरती प्रक्रिया सुरू झाली असून भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवणार असल्याचे महिला व बालकल्याण सभापती आर्कि.अश्विनी आहेर यांनी सांगितले.

समितीची बैठक सभापती आहेर यांच्या अध्यक्षतेखाली (ऑनलाईन ) झाली.त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस समिती सदस्य गणेश अहिर, कविता धाकराव, रेखा पवार, सुनीता सानप, गितांजली पवार गोळे, कमल आहेर समिती सचिव जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपक चाटे व 26 प्रकल्पातील बालविकास अधिकारी सहभागी झाले होते.

नाशिक जिल्हयास माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पवार यांच्या रुपाने प्रथमच केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्याने त्यांच्या अभीनंदनाचा ठराव करण्यात आला.

बालकांचे कुपोषण आढावा

माहे जुन 2021 अखेर वार्षिक कुपोषित बालकांचा आढावा घेतला नाशिक जिल्हयात मध्यम कुपोषित बालके ((मॅम) 2228 अती गंभीर कुपोषित बालके (सँम) 286 आहेत.सन 2020-21 या आर्थिक वर्षात अंगणवाडीतील बालकांना नियमित दिलेला पुरक पोषण आहार तसेच अतिरिक्तआहारामध्ये पोषणकल्पवडी तसेच मायकोन्युट्रन्स दि ल्यामुळे माहे मार्च 2021 च्या तुलनेत माहे जुन 2021 अखेर कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याबाबत सभापती आहेर यांनी सांगितले.

भरती प्रक्रिया आढावा

अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 13 ऑगस्ट 2014 च्या शासन निर्णयात नमुद शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार असून ज्या उमेदवारास जास्त गुण अशाच महिलांची निवड केली जाणार आहे. स्थानिक विधवा महिला, अनु. जाती-जमातीच्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मुलाखत घेणार नसल्याने पारदर्शीपणे भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमिता आढळल्यास संबंधीत बालविकास अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल,असे महिला व बालकल्याण सभापती आहेर यांनी सर्व बालविकास अधिकारी यांना सूचित केले.

अनाथ बालकांची माहीती

करोना बाधीत होवुन मृत्यू झाल्यामुळे बालके अनाथ झालेले आहेत. शासनाने सदर अनाथ बालकांचे पालकत्व स्विकारण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. ग्रामीण भागातील अनाथ बालकांची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी.कोणतेही बालक लाभापासून वंचित राहणार नाही,याची दक्षता घ्यावी, असे सभापती यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निर्देश दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com