Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकेंद्राच्या यादीत आंध्र अव्वल : महाराष्ट्राला मिळाले हे स्थान

केंद्राच्या यादीत आंध्र अव्वल : महाराष्ट्राला मिळाले हे स्थान

नवी दिल्ली:

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने व्यवसाय करण्यासाठीचे योग्य वातावरण असलेल्या राज्यांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत आंध्र प्रदेशने पहिले स्थान कायम राखले आहे.

- Advertisement -

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शनिवारी हा अहवाल मांडला. त्यात महाराष्ट्राला पहिल्या १० मध्ये स्थान मिळेल नाही. दिल्लीनंतर म्हणजे महाराष्ट्राचा १३वा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशने १० क्रमांकाची उडी घेत दुसरे स्थान मिळवले. तर तेलंगणाने तिसरे स्थान मिळवले. गेल्या वर्षी तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर होता. पण या वर्षी उत्तर प्रदेशने त्याला मागे टाकले.या क्रमवारीच्या माध्यमातून राज्यातील गुंतवणुकीसाठीची स्पर्धा वाढवण्याचा उद्देश आहे, असे निर्मला सितारमण यांनी सांगितले.

या क्रमवारीत हरियाणा १६व्या स्थानावर आहे. मागील वर्षी हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर होते. मध्य प्रदेश चौथ्या, झारखंड पाचव्या, छत्तीसगड सहाव्या, हिमाचल प्रदेश सातव्या, राजस्थान आठव्या, पश्चिम बंगाल नवव्या तर गुजरात दहाव्या स्थानावर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या