अंधेरी पूर्व पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी - शरद पवार

शरद पवार
शरद पवार

मुंबई | Mumbai

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या (Andheri East by-election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज देखील सादर केला आहे...

तर भाजपकडून (BJP ) मुरजी पटेल (Murji Patel) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंरतु ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांचे मत आहे. त्यांनी याबाबतचे पत्र भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवले आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील तीच भूमिका घेतली आहे.

यावेळी पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली, त्यात तक्रार करण्याचे काहीही कारण नाही. रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर ऋतुजा लटके निवडणूक लढत आहेत. मुरजी पटेल यांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मला प्रामाणिकपणे वाटते, की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यामुळे एक चांगला संदेश देशभरात जाईल, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, जो उमेदवार निवडून येईल, त्याला केवळ दीड वर्षाचा कार्यकाळ मिळेल. त्यानंतर पुन्हा निवडणुका होतील. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ही आपली संस्कृती राहिली आहे. यापूर्वी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली होती. मुंडे यांच्या परिवारातील कोणी सदस्य उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढवणार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ असे मी म्हणालो होतो, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com