Andheri Bypoll : ठाकरे गटाचे टेन्शन वाढले! अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

राज्यात एकीकडे शिवसेनेच्या (Shivsena) शाखांवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

ही पोटनिवडणूक लढवत असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने आपल्यावर अर्ज माघारीसाठी ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिलिंद कांबळे असे या उमेदवाराचे नाव आहे. कांबळे यांनी ठाकरे गटाविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती.

यामध्ये मिलिंद कांबळे यांनी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आयोग मिलिंद कांबळे यांच्या मागणीची दखल घेऊन अंधेरी पोटनिवडणूक खरंच रद्द करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसे घडल्यास हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

दरम्यान भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com