Friday, April 26, 2024
Homeजळगावअन् मंत्रीपदाचा सट्टा लावून शिंदेंसोबत गेलो!

अन् मंत्रीपदाचा सट्टा लावून शिंदेंसोबत गेलो!

जळगाव । jalgaon

शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री (Water Supply Minister Gulabrao Patil)गुलाबराव पाटील यांनी आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून हिंदुत्वाच्या (protection of Hinduism)रक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर(Chief Minister Eknath Shind) जाण्याचा निर्णय घेतला, असे विधान केले.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील सहा जण ठार ; सहा गंभीर

जळगाव जिल्ह्यातील विवरे-भवरखेडा येथे विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आपल्यातील एक मराठा चेहरा लांब जात आहे. तो जाता कामा नये. त्यांना समजवले पाहिजे, असे उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, जायचे तर जाऊदे.

मग मी पण गेलो. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोक विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असे गुलाबराव पाटलांनी सांगितले.

शेतकर्‍यांना लुटणारे दरोडेखोर 30 तासात जेरबंद

50 खोके आणण्यासाठी दोन ट्रक लागले असते

सात महिन्यांत एकनाथ शिंदे पाचवेळा जळगाव जिल्ह्यात आले आहेत. असा मुख्यमंत्री कोठेही सापडणार नाही. परंतु, आतापर्यंत त्यांच्याबरोबर होतो, तर चांगला होते. आता एकदम बिघडून गेलो. पश्चिम बंगालमध्ये 27 कोटी सापडले होते. ते आणण्याासठी एक ट्रक लागला. मग, 50 कोटी आणायला दोन ट्रक लागले असते ना? असा सवाल खोक्यांच्या आरोपांवरून गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या