Saturday, April 27, 2024
Homeजळगावअन्... आयुक्त डॉ.विद्या गायकवाड आल्या पावली परत गेल्या

अन्… आयुक्त डॉ.विद्या गायकवाड आल्या पावली परत गेल्या

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

चार दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांची शासनाने उचलबांगडी (government took over) केली होती. त्यांच्या रिक्त जागेवर परभणीचे माजी आयुक्त देविदास पवार (Commissioner Devidas Pawar) यांची नियुक्ती (appointment) झाली होती. नूतन आयुक्त पवार यांनी बुधवारी पदभारही देखील स्वीकारला आणि सोमवारी पुन्हा घडामोडी घडून नूतन आयुक्त पवार (New Commissioner Pawar) यांच्या नियुक्तीस मॅटने (Postponement by Mat) स्थगिती दिली. आयुक्त विद्या गायकवाड (Commissioner Vidya Gaikwad) परत जळगाव मनपाचा पदभार घेण्यासाठी (take charge of Jalgaon Municipality ) आज मनपात येणार अशी चर्चा सुरु होती. दुपारी आयुक्त गायकवाड या आल्या आणि नूतन आयुक्त पवार (New Commissioner Pawar)यांच्या दालनात जावून त्यांची सुमारे 40 मिनिट बंदद्वार (closed door discussion) चर्चा झाली.

- Advertisement -

महापालिकेत आयुक्त पदाचा खेळखंडोबा : दुसरे रजेवर तर पहिल्या आज घेणार पदभार

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची चार दिवसापूर्वी उचलबांगडी झाली आणि एकच मनपाच्या राजकीय वर्तूळात चांगलीच चर्चेला उधान आले. तर जळगाव महापालिकेचे नविन आयुक्त देवीदास पवार यांनी 30 नोव्हेंबर रोजी बुधवारी सकाळी जळगावात दाखल होऊन पदभार स्वीकारला. सोमवारी विद्या गायकवाड यांनी मॅट (महाराष्ट्र डमिनीस्टेटीव्ह ट्रिब्युनल) मध्ये धाव घे नूतन आयुक्त देविदास पवार यांच्या नियुक्तीस तुर्तास स्थगिती देण्याचा आदेश दिला. हा आदेश घेवून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आयुक्त पवार यांची भेट घेतली होती.

VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

दोघा आयुक्तांमध्ये रंगली चर्चा

आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी आदेशाची प्रत आणत नूतन आयुक्त पवार यांची भेट घेतली. या भेटीत बंद द्वार नेमकी काय चर्चा झाली ही बाब समजू शकली नसल्याने मनपाच्या वर्तूळात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती.

रजेवर जाणारे आयुक्त मनपात

नूतन आयुक्त देविदास पवार हे गुरुवारी कामकाज करून शुक्रवारी वैयक्तीक रजा टाकून गावी जाणार होते. परंतु डॉ. विद्या गायकवाड या महापालिकेत येणार असल्याची चाहूल त्यांना लागताच आयुक्त पवार हे रजेवर गेलेच नाही. त्यामुळे आयुक्त पदाची खुर्चीसाठी चढाओढ या घटानांमधून दिसून येत आहे.

प्रेमविवाह केलेल्या मुलीला आईवडीलांनीच पळवले

कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम

महापालिकेच्या कर्मचार्‍यांसह संपूर्ण जळगावला आता मनपाचे आयुक्त या दोघांमधून नेमके कोण? असा प्रश्न पडला आहे. नूतन आयुक्ताचा आदेशावर मॅटने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यात आज दुपारी विद्या गायकवाड या देखील मनपात आल्याने मनपा कर्मचार्‍यांची दमछाक होवून चांगलाच गोंधळ उडालेला दिसत होता. आयुक्त पवार यांची भेट घेवू आल्यानंतर गायकवाड यांची आयुक्तांच्या दालनाबाहेर उभ्या असलेल्या महिलांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी आयुक्त गायकवाड यांनी देखील त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

नंदुरबार येथे ग्रंथप्रेमींसाठी 5 डिसेंबरपासून ग्रंथोत्सवाचे आयोजन

आयुक्तांनी बोलणे टाळले

नूतन आयुक्त देविदास पवार यांची भेट डॉ. विद्या गायकवाड यांनी घेतल्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मॅटच्या आदेशाची प्रत आयुक्त पवार यांना दिली असल्याचे सांगून चर्चे दरम्यान काय झाले ते बोलण्यास त्यांनी टाळले. तसेच आयुक्त पवार यांना देखील यावर बोलणे टाळून डॉ. विद्या गायकवाड यांनी भेट घेतली असून मॅटच्या आदेशीची प्रत दिली आहे. मी माझी बाजू वकिलामार्फत मॅट मध्ये मांडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या