व्हिडिओ स्टोरी : नाशिकमध्ये कान्हेरेंनी अशी केली जॅक्सनची हत्या

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

२१ डिसेंबर आणि विजयानंद नाट्यगृह यांना नाशिकच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. या दिवशी ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या केली होती.

२१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद नाट्यगृहामध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच.

नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले. त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

१९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये ‘अनंत कान्हेरे’ नावाचे क्रिकेटचे मैदान आहे. जॅक्सन संस्कृत भाषेचा जाणकार असलेला जॅक्सन हा भारतीय इतिहास, संस्कृती व देशी लोककथा यांचा अभ्यासक होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *