आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ म्हणाले, चक्रीवादळात ती महिला...

आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ म्हणाले, चक्रीवादळात ती महिला...

मुंबई

उद्योगपती आनंद महिंद्रा चांगल्या विषयांवर नेहमी टि्वट करत असतात. त्यांच्या टि्वटमुळे माध्यमांना बातम्या मिळत असतात.

राज्याला तौक्ते चक्रिवादळाचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर #CycloneTauktae शी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर झाले. यामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आनंद महिंद्रा हा व्हिडिओ पाहून इतके प्रभावित झालेत की, त्यांनी हा व्हिडिओ रिट्वीट केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. त्यानंतर बीएमसीशी विनंती करीत सांगितलं की, सर्व सफाई कर्मचाऱ्यांजवळ रेनकोट आहे की नाही याची एकदा चाचपणी करून घ्यावी. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्यांना सन्मान द्या, अशा परिस्थितीत मला हा अनुभव येतोय की, मी किती भाग्यशाली आहे.

काय आहे व्हिडिओत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहू शकता की, एक महिला पावसात रस्त्यावर कचरा काढत आहे. यादरम्यान महिलेने डोकं पॉलिथिनने कव्हर केले आहे. पावसात भिजत असताना ती आपले काम करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com