Video : कमरे इतक्या पाण्यातून काढली कार, आनंद महिंद्रा झाले आश्चर्यचकीत

Video : कमरे इतक्या पाण्यातून काढली कार, आनंद महिंद्रा झाले आश्चर्यचकीत

गुजरातच्या (gujarat)सौराष्ट्र परिसरात मुसळधार पावसामुळे (heavy rain)परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राजकोट आणि जामनगर भागात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आले आहे. यासंदर्भात महिंदा कंपनीच्या बोलेरो कारचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियात (social media)सध्या तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra)यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ट्विटरवर एका व्यक्तीनं गुजरातमधील पुराच्या पाण्यातून एक कार चालक आपली बोलेरो कार चालवल्याचा व्हिडिओ ट्विट केला. रस्त्यावर कमरे इतके पाणी असतांना त्यातूनच बोलेरो कार सहजपणे घेऊन जाताना दिसत आहे. कार बंद न पडता पाण्याच्या वेगाचा प्रतिकार करत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतं. संबंधित कार एक पोलीस वाहन असून नागरिकांच्या मदतीसाठी जात असल्याचं सांगितलं जात आहे. टि्वटरवर हा व्हिडिओ गुजरात पोलीस, राजकोटचे जिल्हाधिकारी आणि महिंद्रा अँड महिंदा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना टॅग केला आहे.

"महिंद्रा है तो मुमकिन है’

"महिंद्रा है तो मुमकिन है’, अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आनंद महिंद्रांनी देखील हा व्हिडिओ रिट्विट केला असून त्यावर "खरंच की काय? हा आत्ताच्या पावसातला व्हिडिओ आहे का? मी खरंच आश्चर्यचकीत झालोय", अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Video : कमरे इतक्या पाण्यातून काढली कार, आनंद महिंद्रा झाले आश्चर्यचकीत
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com