माजी खेळाडू बोलले, वाईट पद्धतीने टीम इंडिया पराभूत होईल; आनंद महिन्द्रांनी काढला चिमटा

माजी खेळाडू बोलले, वाईट पद्धतीने टीम इंडिया पराभूत होईल; आनंद महिन्द्रांनी काढला चिमटा

भारताने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सिरीज २-१ ने आपल्या नावे केल्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे...

माजी खेळाडूंनी यंग टीम इंडियाच्या प्लेयर्सला शुभेच्छा दिल्या. अशातच नेहमीच ट्विटरवर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच

आनंद महिंद्रा यांनीदेखील ऑस्ट्रेलियासह इतर देशांच्या ज्येष्ठ खेळाडूंना चिमटा काढला आहे.

त्याचे झाले असे की, इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉ याने लिहिले होते की, या टेस्ट सिरीज मध्ये भारताला ४-० असा पराभव स्वीकारावा लागेल.

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क वॉ यानेही मला समजत नाहीये की भारत या सिरीज ला कसे सामोरे जाईल.

ऑस्ट्रेलिया ही सिरीज ४-० ने जिंकेल. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ने सांगितले होते कि फक्त भारत एडीलेडमध्ये विजय मिळवू शकतो. मला वाटत नाही भारत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करू शकेन.

या सर्वांच्या प्रतिक्रिया मिळून आनंद महिंद्र यांनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आपण काय खाऊ इच्छिता ग्रिल्ड, फ्राईड किंवा बेक केलेले...चपाती किंवा डोसा यात एकत्र केलेले.

ब्रिसबेन टेस्ट भारताने आपल्या नावे करून इतिहास रचला. भारताने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टेस्टमध्ये तीन विकेट्सने पराभव केला.

भारताकडून युवा फलंदाज ऋषभ पंत आणि शुभमान गिल यांनी भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केले.

गिलने ९१ धावांची खेळी केली तर पंतनेही धावसंख्या वनडे प्रमाणे हाकून नेली. पंतच्या व्यतिरिक्त पुजाराने देखील ५६ धावांचे योगदान दिले.

टेस्ट क्रिकेटमध्ये भारताने तिसऱ्यांदा सर्वात जास्त धावा काढून विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियाला ३३ वर्षानंतर या मैदानावर एखादी टेस्ट सिरीजमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com