Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापोलिस पाटलांना निवडणुकीच्या रिंंगणत उतरण्याची संधी

पोलिस पाटलांना निवडणुकीच्या रिंंगणत उतरण्याची संधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था (Law and order) राखण्यासाठी पोलिसाना सहकार्य करण्यात महत्वाची भुमीक बजावणार्‍या पोलिस पाटलांना (Police Patil) विशेष उल्लेखणीय सेवा पुरस्कार (Service Award) व उल्लेखणीय शौर्य पुरस्कार देण्यात येणार,

- Advertisement -

प्रत्येक गावात ग्राम पंचायतीत (gram panchayat) स्वतंंत्र कार्यालय मिळणार, सहकारी संस्थेची निवडणुकही (election) आता पोलिस पाटील लढवु शकणाार आहेत. असे महत्वाचे निर्णय पोलिस पाटलांबाबत झाले आहे.

राज्यात साडेचार हजार पोलीस पाटील (Police Patil) कार्यरत आहेत. शासन आणि स्थानिक पातळीवरील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. गेल्या दहा वर्षापासूनसू पोलीस पाटील किमान पंचवीस हजार रुपयांचे मानधन मिळावे. पोलीस पाटलांच्या पाच वर्षांचे नूतनू नीकरण पद्धत कायमस्वरूपी बंद करावी, पोलीस स्टेशन (Police Station) आणि पोलीस चौकी असलेल्या गावांमध्ये पोलीस पाटील पद कायम ठेवावे, त्यांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे पर्यंत करावे, कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या पोलीस पाटलांच्या वारसांना अनुकंनुकंपात धर्तीवर पोलीस पाटीलपदी नियुक्त करावे.

कोरोना (corona) काळात दगावलेल्या पोलीस पाटलांच्या वारसांना पन्नास लाखांची मदत द्यावी, किमान वेतन कायदा लागू करावा, पोलीस पाटलांच्या मुलांना पोलीस भरतीत (Police Recruitment) प्राधान्य द्यावे, सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन किंवा दहा लाख रुपये एक रकमी देण्यात यावे, तसेच वाळू संदर्भात लावलेल्या ड्युटया कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात, आदी विविध मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरवा करत आहे. त्यातील शौर्य पुरस्कार देण्याचा निर्णय आता झाला आहे.

अतुलनीय साहस यासाठी राज्यपाल पुरस्कार देण्यासाठी गृह विभागाने निर्णय घेतला आहे. या पूरस्कारासाठी निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा निवड समिती गठीत करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. राज्यपालांच्या सहीचे प्रशस्तीपत्र व पंचवीस हजार रुपये, असे पूरस्काराचे स्वरुप आहे.तसेच ग्रांमपचायती मध्ये बसण्यासाठी स्वतंत्र टेबल खुर्ची मिळणार आहे. आता सहकारी संस्थेतही पोलिस पाटील उमेदवारी करु शकणार आहेत.

माना बोरबर धनही वाढवा

एकीकडे पोलिस पाटलांचा गावात रुबाब वाढवत असला तरी त्या प्रमाणात त्यांची आर्थीक परीस्थीतीही असली पाहीजे. अशी त्यांंची अपेक्षा आहे. कारण सध्या पोलीस पाटलांना साडेसडे सहा हजार रुपये एवढे तुटतुपुंजेपुंंजे मानधन मिळत आहे. महागाईच्या काळात दोनशे रपये रोजात गाडा चालवीणे अवघड होते. म्हणुनच किमान 18 हजार रुपये तरी मानधन करा.

ही त्यांची मागणी आहे. त्यासाठी ते 22 डिसेंबरला नागुपर विधानसभवेर धडकणार आहेत.नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटीलही यात मोठ्या संंख्येने सहभागी होणार आहे. पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण बोडके व सहाकारी हा मोर्चा यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहे. पालकमंंत्री दादा भुसे यांनाही त्यांनी निवेदन देऊन लक्ष्य वेधले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या