Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासिटीलिंकसाठी हवा उपसचिव दर्जाचा अधिकारी

सिटीलिंकसाठी हवा उपसचिव दर्जाचा अधिकारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिटीलिंक (Citylink) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) पदासाठी महापालिकेला उपसचिव अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हवा आहे. यापदावर प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्त करण्याची मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे (State Government) केली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या (Municipal Corporation) माध्यमातून गेल्या 8 जुलै 2021 पासून नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून ‘सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक’ ही शहर बससेवा सूरु कण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) हे नाशिक महानगर परिवहन (Transport Corporation) महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

सद्यस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर महापालिकेचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके हे काम पाहत आहेत. चव्हाणके हे येत्या काही महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदावर शासन सेवेतून उपसचिव अथवा उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या