Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; मंत्रिमंडळ बैठकीत घेतला 'हा' निर्णय

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; मंत्रिमंडळ बैठकीत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या (Compensation to farmers affected by heavy rains) मदतीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (NDRF) निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

त्यानुसार शेतकऱ्यांना प्रती हेक्टर १३ हजार ६०० रुपयांची मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी या निर्णयाची माहिती दिली. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असून दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत दिली जाणार आहे.

राज्यात जुलै महिन्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला होता.

याशिवाय विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना घसघशीत मदत देण्याचा निर्णय झाला.

सध्या एनडीआरएफच्या निकषानुसार ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पीकक्षेत्राला प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपयांची मदत दिली जाते. मात्र, राज्य सरकारने एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्याना प्रती हेक्टर १३ हजार ६०० रुपये मदत मिळणार आहे. तीन हेक्टर मर्यादेत म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ४० हजार ८०० रुपयांची मदत मिळेल.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

देशात महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांसह बुधवारी मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना शिंदे यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे त्र्यांनी आपापली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या