Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या गुप्त भेटीबाबत अमृता फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या गुप्त भेटीबाबत अमृता फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

मुंबई । Mumbai

राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर सत्तातरण होऊन महाविकासआघाडी सरकारच्या (mahavikas aaghadi) जागेवर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis government) आले आहे. तसेच हे सरकार येण्यापूर्वी पडद्याआड काय घडामोडी घडल्या याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी दोन दिवसाच्या विधानसभा अधिवेशनात यातील काही भाग सांगत रात्रीच्या गुप्त भेटींचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे…

- Advertisement -

यावेळी बोलतांना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस सामान्यपणे खूप उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे मला जास्त लक्षात आले नाही, पण कधीकधी ते चष्मा व हुडी घालून बाहेर पडायचे. ते असे दिसायचे की मलाही ओळखू यायचे नाही. मी त्यांना असे एवढ्यात नवीन काय सुरू आहे असे विचारले. ते उत्तर देणे टाळायचे. मला तरी काही ना काही चालू आहे असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाही हे मला आधीची माहित होते. ते कोणतेही पद स्वीकारणार नव्हते. त्यांच्या या निर्णयाचा मला खूप गर्व वाटतो. त्यांनी दाखवून दिले की, पदापेक्षा महाराष्ट्राचे हित महत्वाचे आणि मोठे आहे. त्यांनी मोठ्या मनाने, हसतमुखाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे नेहमी कामाला महत्त्व देत असतात, पदाच्या पलिकडे जाऊन ते जनतेच्या हिताचे काम करत आहे. त्यांना महाराष्ट्राची सेवा करायला आवडते. याआधीही ते आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री असताना लोकांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. आताही ते सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहे. एकनाथ शिंदे हे २४ तास काम करत असतात. त्यामुळे दोघेही महाराष्ट्राच्या हिताचे काम करतील, असा विश्वासही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या