Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याअमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनरविरोधात तक्रार; काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनरविरोधात तक्रार; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी (Wife) अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) एका डिझानयर विरोधात धमकी आणि कट रचल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अमृता फडणवीस यांना अनिक्षा नावाच्या एका डिझानयर महिलेने (Designer Woman) अप्रत्यक्षरीत्या धमकावले. त्यानंतर त्या महिलेने अमृता फडणवीसांविरोधात कट रचून १ कोटींची लाच ऑफर केली.

लोकसभेसाठी मविआच ठरलं? कोण किती जागा लढवणार; वाचा सविस्तर

तर संबंधित महिला जवळपास १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तसेच एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी या महिलेने अमृता फडणवीसांकडे केली होती. तसेच तुम्हाला १ कोटी देऊ, अशी ऑफरही अमृता फडणवीसांना संबंधित महिलेने आणि तिच्या वडिलांनी (Father) दिली होती.

नाशिक-मुंबई महामार्गावरून जाताय? आधी ही बातमी वाचा

दरम्यान, यानंतर अमृता फडणवीसांना फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar Hill Police Station) तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडीलांविरोधात कलम १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या