जळगावातील एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये घडतय काय.. सुरक्षा रक्षकाचा मृतदेह जळतोय काय...

जळगावातील एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये घडतय काय.. सुरक्षा रक्षकाचा मृतदेह जळतोय काय...

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसी (MIDC)पोलीस ठाण्यासमोरील बंद पडलेल्या कंपनीच्या (closed companies) गुरुवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास आवारात ईश्वर देवराम अहिरे (वय-66, रा. रामनगर) या सुरक्षा रक्षकाचा (security guard) मृतदेह पुर्णपणे (body burning)जळलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांकडून वृद्धाने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात झाला. त्याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील मेहरुण परिसरातील राम नगरात ईश्वर अहिरे हे वास्तव्यास असून ते सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्या समोर असलेल्या विक्रम प्लास्टिकच्या बंद पडलेल्या कंपनीत गुरुवारी सकाळच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. त्याठिकाणी काम करणारे सुरक्षा रक्षक काशिनाथ मराठे हे रात्रीची ड्युटी करुन परत येत होते. त्यांनी कंपनीचे गेट उघडताच त्यांना कंपनीच्या आवारात काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी जवळ जावून पाहिले असता एक इसम जळालेल्या अवस्थेत दिसून आला. मराठे यांनी घटनेची माहिती लागलीच सुरक्षारक्षक पुरविणार्‍या मालकाला दिली. मालकान घटनास्थळी धाव घेत पोलिसांना घटनेबाबत कळविले.

पगार झाल्यापासून जात नव्हते कामावर

तीन ते चार दिवसांपुर्वीच ईश्वर अहिरे यांचा पगार झाला होता. तेव्हापासून ते कामावर जात नव्हते. तसेच त्यांना दारुचे व्यसन असल्याने ते दिवसभर दारुच्या नशेत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वृध्दाच्या मृत्यूबाबत वेगवेगळी कारणे समोर येत आहेत.

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पत्नीचा जळून झाला होता मृत्यू

काही वर्षांपुर्वी मयत ईश्वर अहिरे यांच्या पत्नीचा जळून मृत्यू झाला होता. तर त्यांच्या नातूने काही दिवसांपुर्वीच गळफास घेवून आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु होते. घटनेच्या दिवसापासून अहिरे हे प्रचंड दारुच्या नशेत देखील राहत होते अशी माहिती देखील पोलिसांनी दिली.

नातेवाईकांचा आक्रोश

मयत ईश्वर अहिरे यांची ओखळ पटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अहिरेंचा मृतदेह बघताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

अपघात की घातपात?

वृद्ध सुरक्षा रक्षकाच्या जळालेल्या मृतदेहबाबत घटनास्थळावर वेगवेगळया चर्चा सुरु होत्या. यावेळी वृद्धाला कुणी जाळले असावे तर सुरक्षा रक्षक हा शेकोटी करण्यासाठी आला असावा आणि मद्याच्या नशेत आगीत पडून मयत झाला असावा. तसेच वृध्दाने दारुच्या नशेत आत्महत्या केली असावी अशी देखील चर्चा सुरु असून वृद्धासोबत घातपात झाला की त्याचा अपघात झाला याबाबत पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

बुटावरुन पटली मयताची ओळख

पोलिसांनी घटनास्थळाची दाखल झाल्यानंतर संपुर्ण कंपनीची देखील पाहणी केली. दरम्यान, घटनेची वार्ता संपुर्ण परिसरात परसताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी मयताच्या बुटावरुन ते ईश्वर अहिरे यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com