Sunday, April 28, 2024
Homeजळगावभाजपाचे अमोल शिंदे २४ तारखेला करणार आमदारांचा पर्दाफाश

भाजपाचे अमोल शिंदे २४ तारखेला करणार आमदारांचा पर्दाफाश

पाचोरा Pachora प्रतिनीधी

पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या (Pachora Bhadgaon Agricultural Produce Market Committee) निवडणुक (election)रणधुमाळित आजी -माजी आमदारांच्या पॅनल सोबतच भारतिय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) अमोल शिंदे (Amol Shinde) यांच्या पॅनलने (panel) आव्हान उभे करून तिरंगी लढतिचे चिञ निर्माण केले आहे. विद्यमान आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) व माजी आमदार दिलिप वाघ (Former MLA Dilip Wagh) यांनी वेगवेगळ्या  पञकार परिषदेत शिंदे परिवारा वर आरोप (Allegation) होत आहे.  या आरोपांचे खंडन करण्यासाठी व बाजार समीतीच्या निवडणुकीबाबतची भुमिका मांडण्यासाठी भाजपाचे अमोल शिंदे व सतिष शिंदे यांनी उमेदवारांसह पञकार परिषद घेतली.

- Advertisement -

 यावेळी पञकार परिषदेला जिल्हा चिटणिस सोमनाथ पाटील,भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, शहर अध्यक्ष रमेश वाणी, गोविंद शेलार आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी सहकार पॅनलच्या उमेदवारांचा परिचय अमोल पाटील यांनी करून दिला. 

  भाजपा पाचोरा तालूकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पञकारांशी संवाद साधतांना सांगितले की,भाजपा पुरस्कृत पॅनलमध्ये सहकाराचा अभ्यास, शेतकरी व सर्वसामान्यांशी नाळ असलेले शिक्षित १८ जण उमेदवारी करित आहेत. मला ठाम विश्वास आहे की,आमचे पॅनल सर्वोच्च मताधिक्यांनी विजयी होणार आहे.

आमदार किशोर पाटील,माजी आमदार दिलीप वाघ यांनी घेतलेल्या मेळावे व पञकार परिषदांमधुन शिंदे परिवारावर बाजार समीतीच्या जागा कवडिमोल भावात घेतल्याच्या आरोपांवर बोलतांना म्हणाले कि, आमदारांनी  आरोप करतांना पुराव्यांशिवाय बोलू नये. आजी माजी आमदारांच्या बाजार समीतीतिल सत्ता नेतृत्वातच जागा विक्रीचे घाट घातले गेले होते.

मागिल काळात जी जागा आम्ही घेतली ती लिलाव पध्दतिने सर्वाधिक बोली बोलुन कायदेशिर प्रक्रियेत खरेदी केली आहे. त्यावेळी आमदार किशोर पाटिल यांची बाजार समीतित सत्ता होती व मी त्यांच्या सोबत होतो.आमदारांनी ती जागा का विक्री झाली याची कारणे शोधली पाहिजे.बाजार समीतीने जेंव्हा कर्ज घेतले त्यावेळी आमदारांच्या नेतृत्वात रावसाहेब पाटील हे सभापती होते. त्यानंतर दिलिप वाघ यांच्या नेतृत्वातील सत्तेत पुन्हा कर्ज काढले. परंतु यांनी कर्ज फेडले नाही.

२०१५ साली कर्ज फेडण्यासाठी समीतीची जागा विक्री करून कर्ज फेडावे लागेल असा ठराव करण्यात आला.तेंव्हा दिलिप वाघ यांची सत्ता होती.नंतर सत्तांतर होउन सतिष शिंदे सभापती असतांना  यांनी सत्तेचा आणी कायद्याचा गैरवापर करून आमचे सदस्य अपाञ केल्याचा आरोपात तथ्य नाही.याउलट सतिष शिंदे यांच्या नेतृत्वात सहकार मेळावा,कृषी प्रदर्शन,वार्षिक सभा,कामाला वार्षिक अहवाल,शेतकरी व व्यापारी हिताची कामे झाली.दोन वर्षाच्या कार्यकाळात सतिष शिंदे यांनी एक रूपयांचे कर्ज न घेता दिड कोटींचे कर्ज फेडले.

वरखेडी गुरांच्या बाजारात शेतकर्‍यावर कोणतीही दादागिरी व दमदाटी केली नाही.दादागीरी करणारी लोक ही किशोर पाटील यांचेच होते. आमदारांनी माजी आमदार दिलिप वाघ यांची शिफारस देउन मुख्य प्रशासक पदी नेमणूक केली.या काळात बाजार समीतीची मुतारी पाडुन गाळा बांधला.व्यापारी संकुलातिल गाळ्यांना वाढिव जागा देउन दोघांनी संगनमताने करोडो रूपये कमविले.  नव्हे तर समीतीचे मुख्य प्रवेशद्वार देखिल तोडुन बांधण्याचा यांचा घाट होता.

आमदडा शेतकी संघाची जागा,बाजार समीतीच्या जागेवर उभे असलेल्या ड्रिम सिटिची जागा,भडगाव येथिल जागा विकत घेउन तेथे व्यापारी संकुल उभारले याबाबत आमदार का बोलत नाहीत.मागिल १० ते१५ वर्षात समीतीत २० संचालकांवर अनाठाई खर्चाच्या जबाबदार्‍या निश्चित करून त्याच्याकडुन दिड कोटी रूपये वसुल केली ही लोक कुणाची होती.भाजीपाला यार्डाची जागा अमोल शिंदे यांनी खरेदी केली याचे पुरावे आमदारांनी द्यावे. याउलट सतिष शिंदे सभापती असताना या जागाची शासकिय किंमत वाढली पाहीजे आणी ही जागा विक्रि होउ नये असे पञ तत्कालिन पालकमंञी चंद्रकांत पाटील यांना देउन जागा विक्रि थांबवावी असे पञ दिले होते.

आमदारांनी केलेल्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी आमदारांनी मला कोठेही बोलवावे मी तयार आहे.आमदारांची परदेशी दौर्‍याची धुंदी उतरलेली नाही.कोणतेही पुरावे नसतांना ते मुळ विषयांना बाजुला ठेउन पञकार परिषदेत आरोप करतात.

तात्यासाहेब आर.ओ.तात्या आणी शिवसेनेशी गद्दारी कुणी केली. खोके व गद्दारीचा कलंक असणार्‍यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.आमदारांनी केलेल्या सर्व आरोपांना उत्तरे देण्यासाठी २४ एप्रिल रोजी सहकार शेतकरी  पॅनलचा जाहिर  मेळाव्यात आनंदोत्सव साजरा करणार आहे.

शेतकर्‍यांचा कळवळा दाखवणार्‍या आमदारांचा पर्दाफाश करून पुराव्यासह दुध का दुध पाणी का पाणी करणार आहे.  आमदारांना सत्तेची धुंदी चढली आहे. पाचोर्‍यातिल अनैक आरक्षित भुखंड कुणी घेतले, सौदा पावत्या कुणाच्या नावाने आहेत. आणी कोण कुणी कुणाच्या जागा घेतल्या हे पुरावे  प्रचारात देणार आहे.

भाजपचे काही लोक आमच्या सोबत आहे असे आमदार म्हणतात.परंतु स्थानिक पातळिवर पक्षसंघटनेला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. सर्व स्थरावर भाजपा शिवसेनेची युती असतांना आमदारांनी मतदारसंघात भाजपाला कधीही सोबत घेतले नाही.आम्ही बाजार समीतीची कोणतीही जागा विकत घेणार नाही किंवा विकणार नाही. आमदारांचे पॅनल तिन नंबरवर राहिल असा दावा अमोल शिंदे यांनी केला. माझ्या काळात कोणतीही जमीन विकल्या गेली नाही.आणी कोणतेही कर्ज घेतले गेले नाही.यांचेच कर्ज मी फेडत होतो.असे सतिष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सहकार शेतकरी पॅनल 

सोसायटी सर्वसाधारण मतदार संघाच्या ७ जागांसाठी सुदाम देवरे,ईश्वर पाटिल,दिलिप पाटिल,भास्कर पाटील,विश्वनाथ पाटिल,सतिष शिंदे,युवराज सुर्यवंशी सोसायटी ओ.बी.सी.मतदार संघाच्या जागेसाठी अॅड.विश्वासराव भोसले,सोसायटी एन.टी.जागेसाठी जिजाबराव हाटकर,महिला राखिव मतदार संघाच्या दोन जागांसाठी सरला विकास पाटिल,सिंधुताई पंडितराव शिंदे,ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघाच्या दोन जागांसाठी विष्णु पाटिल,शरद पाटील,ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल जागेसाठी भुषण पाटील,ग्रामपंचायत अनुसुचित जाती जागेसाठी श्रावण लिॅडायत,व्यापारी मतदार संघाच्या दोन जागांसाठी देवेन कोटेचा,शेख सलिम बागवान व हमाल मापाडी जागेसाठी शहा गणी शहा चाॅंद असे उमेदवार  निवडणूक लढवीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या