Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या"मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..."; आमदार अमोल मिटकरींचे सूचक ट्वीट

“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”; आमदार अमोल मिटकरींचे सूचक ट्वीट

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर कालपासून अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक राज्यात जागोजागी लागल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

यामध्ये काही ठिकाणी अजित पवार यांना शुभेच्छा देतांना भावी मुख्यमंत्री (CM) असा उल्लेख असलेले फलक देखील झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्या या फलकावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Rain Alert : राज्यात आज कुठे पडणार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट? वाचा…

अजित पवार यांच्या वाढदिवसानमित्त (Birthday) आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये आमदार मिटकरी यांनी लिहिले आहे की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…” असे म्हटले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तसेच मिटकरी यांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यात अजित पवार यांची भाषणे (Speech) दाखविण्यात आली आहेत. अजित पवार यांच्या सभा, संमेलानातील व्हिडीओ दाखविण्यात आले आहे. याशिवाय अजित पवार यांना संघर्ष योद्धा संबोधत त्यांना निडर नेतृत्व आणि करारी व्यक्तीमत्त्वही अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

..तर मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई होणार – मंत्री शंभूराज देसाई

दरम्यान, काल (शुक्रवार) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. कुठं काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील किंवा राजकीय असतील. परंतु अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होतील यात शंका नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केल्याने अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना आणखी ऊत आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या