अमिताभ बच्चन यांच्या घरातील कर्मचाऱ्यास कोरोना: परिवार सुरक्षित

अमिताभ बच्चन यांच्या घरातील कर्मचाऱ्यास कोरोना: परिवार सुरक्षित

मुंबई :

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरावरही कोरोनाचं (corona)सावट आलं आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईतील ‘जलसा’ येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील सदस्य सुरक्षित आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या घरातील कर्मचाऱ्यास कोरोना: परिवार सुरक्षित
कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

अमिताभ बच्चन यांच्या घरातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या घरातील एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’ला कोरोनाचा फटका बसल्याची बातमी त्यांच्या अधिकृत ब्लॉगद्वारे दिली आहे. तथापि, त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याची पुष्टी केली नाही की, जलसामधील कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी लिहिले की, ‘मी सध्या घरगुती कोरोना परिस्थितीशी झगडत आहे. मी नंतर तुमच्या भेटीला येईन…’ त्यामुळे अमिताभ यांच्या परिवारातील सदस्यास कोरोना झाला की काय? ही चर्चा सुरु झाली होती. परंतु अमिताभ बच्चन यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्या कोरोना झाला नसल्याचे सप्ट झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com