अमिताभ
अमिताभ|चित्रपट
मुख्य बातम्या

करोना चाचणीसंदर्भात अमिताभ बच्चन यांनी केला हा खुलासा

चाचणीचा अहवाल अजून नाहीच

jitendra zavar

jitendra zavar

मुंबई। Mumbai

हिंदी चित्रपटाचा बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या काही दिवसांपासून करोनाशी लढा देत आहे. त्यांची प्रकृती बरी झाली असून त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे वृत्त आले होते. परंतु हे वृत्त चुकीचे आहे. त्याचा खुलाशा स्वत: अमिताभ बच्चन यांनी केला आहे.त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची बातमी वेगाने पसरली होती. मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. अद्याप अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या संबधितही कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या प्रार्थनांमुळे त्यांनी त्यांचे आभार मानले होते. आज देखील त्यांनी यासंदर्भातील एक ट्वीट केले होते.

Deshdoot
www.deshdoot.com