
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( Maharashtra Navnirman Sena)संघटन मजबूत करण्यासह आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे ( Amit Thackeray)दोन दिवसांच्या नाशिक दौर्यावर येत आहेत.
आज (दि.27) सकाळी 9.30 वाजता त्यांचे आगमन होणार आहे. तर सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ते पक्षाच्या मुख्यालय असलेल्या राजगड या ठिकाणी येणार आहेत. तेथे शाखा प्रमुखांशी त्यांची वन टू वन चर्चा होणार आहे. त्यानंतर वाहतूक सेनेच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे. त्याचप्रमाणे बुधवारीदेखील उर्वरित शाखाप्रमुखांशी चर्चा करून विधानसभानिहाय ते आढावा घेणार आहेत.