Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअमित शहांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी...

अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी…

पुणे | Pune

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून काल त्यांनी आपल्या पुणे दौऱ्यात मोदी@ 20 या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह युपीए सरकारवर निशाणा साधला…

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीवेळी मी भाजपचा (BJP) अध्यक्ष होतो. त्यावेळी आम्ही निवडणूक युती म्हणून लढलो. स्वतःच्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावून उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. त्यानंतर देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली. मात्र, मुख्यमंत्री हे पद मिळावे म्हणून उद्धव ठाकरेंनी विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress and NCP) तळवे चाटले. असे म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाव व चिन्ह मिळवण्यासाठी २००० कोटींचा सौदा; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही मिळाले आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा. तसेच जे लोक खोटेपणाच्या आधारावर हुंकारत होते त्यांना आता सत्य काय आहे ते समजले. तसेच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची विचारधारा आणि शिवसैनिकांसोबत दगाबाजी केली असल्याने आता ‘दूध का दूध और पानी का पानी झालं आहे’ त्यामुळे उद्धव ठाकरेंना माफ करता कामा नये असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

Shiv Jayanti 2023 : किल्ले शिवनेरीवरील नियोजनावरून संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

तर युपीए सरकारवर टीका करतांना शाह म्हणाले की, २००४ ते २०१४ या कालावधीत देशात सरकारला धोरण लकवा मारला होता. हे सरकार असं होतं की प्रत्येक मंत्री स्वतःला पंतप्रधान मानत होता आणि पंतप्रधानांना कुणीही पंतप्रधान मानायला तयार नव्हत. दहशतवादी रोज आपल्यावर हल्ला करू लागले होते. लष्कराच्या जवानांना त्रास देत होते. विदेशातही आपल्या देशाचे पंतप्रधान (PM) असलेल्या मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांना काही सन्मान नव्हता. २०१४ च्या निवडणुका लागल्या तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यावेळी मोदी लाट आली आणि संपूर्ण देशाने मोदींना निवडून दिलं. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रकारचे चांगले परिवर्तन देशात झालं असेही अमित शाह यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या